मला नेटफ्लिक्स आवडण्याची अनेक कारणे आहेत. स्पेसिफिकली, चांगल्या वेब सिरीज आणि उत्तम डॉक्यु सिरीज त्यावर पाहता येतात ही २ महत्वाची कारणे आहेत. असाच स्क्रोल करत असता एक उत्कृष्ट सिरीज सापडली, THE Kominsky Method - आणि पहिलाच एपिसोड पाहताना जाणीव झाली की - YES I have struck gold !!!!!
दोन मित्रांची गोष्ट, वय ७० च्या आसपास, अनेक वर्षांची मैत्री आणि त्यातून असलेला त्यांचा प्रचंड गोड़ आणि तिरकस संवाद. मला माझ्या जवळच्या मित्राची आठवण झाली - धवल. आमच्यात असा संवाद असतो. मज्जा आली. पाहत गेलो, त्यांची chemistry इतकी अप्रतिम लिहिलीये की ती पाहताना मजा येते.
आपल्या आयुष्यात किती गोष्टी घडत असतात - पण त्या घडत असताना आपल्या मित्रांसोबत बसून जेव्हा आपण त्याबद्दल चर्चा करतो तेव्हा आपल्याला मित्रांकडून मिळणाऱ्या input मुळे काय होऊ शकतं, यावर ही सिरीज आहे. हे दोघे जण सतत एकमेकांना विचारून आयुष्यातले निर्णय घेतात. इतर मित्रांच्या funeral ला एकत्र जातात. कधीच सरळ बोलत नाहीत एकमेकांशी. पण जेव्हा त्या दोघांना एकमेकांची गरज भासते तेव्हा त्यांना एकमेकांचं महत्व सुद्धा समजत असतं .
त्यांच्या नात्यात तो एक छान धागा नेहमी ठेवलाय. chuck lorre या अप्रतिम लेखकाने लिहिलीये ही सिरीज - यांनी young sheldon ही सुद्धा लिहिलीये. अप्रतिम लेखक आणि दिग्दर्शक.
micheal douglas आणि alan arkin या उत्तम अभिनेत्यांनी त्यांच्या अनुभवानुसार उत्कृष्ट अभिनय केलाय - खरेच मित्र असावेत real आयुष्यात सुध्दा !!
प्रत्येक माणसाला ही दोस्ती पाहून नक्कीच असं वाटेल की आपल्या आयुष्यात पण असा एक मित्र निदान असावा, ज्याच्यासोबत आपण काहीही शेअर करू शकतो.
मैत्री ला सर्वस्व मानणाऱ्या प्रत्येकाने - तसेच अतिशय quirky संवाद आवडणाऱ्या प्रत्येकाने पहिलीच पाहिजे अशी अप्रतिम सिरीज आहे ही....
