Thursday, 5 July 2018

Mrs. Doubtfire !!!!!







मिसेस डाउटफायर -  हसवणारा आणि रडवणारा एक निखळ सिनेमा. I  think ज्या वयात मी हा सिनेमा पहिला तेव्हापासून Hollywood नामक जादुई चित्रनगरीच्या प्रेमात पडायला लागलो.... कसले गोड़ सिनेमे बनवतात हो ?

एका नालायक माणसाची गोष्ट आहे ही. जो आयुष्यात फार काही काम करून, यश नाही मिळवू शकला पण, त्याने आपल्या मुलांवर खूप प्रेम केलं. बायकोशी पटत नव्हतं, त्याला मुक्त आयुष्य जगायचं होतं आणि तिला महत्वाकांक्षा होती. एक दिवशी अचानक काम सोडून घरी आला आणि मुलांसोबत वाढदिवसाची पार्टी करताना त्याने घरात धुमाकूळ घातला. मुलांना मजा आली, पण शेजाऱ्यांना झालेल्या त्रासामुळे बायको वैतागली आणि इतके दिवस सहन केलेला त्रास तिने डिवोर्स देऊन संपवला. 

कोर्टाने मुलांची कस्टडी बायकोला दिली, आणि एका क्षणात या माणसाचं आयुष्य होत्याचं नव्हतं  होऊन बसलं, मग त्याने काय केलं ? आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी ? ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर बोल खाल्ले, त्या सगळ्या गोष्टी, केवळ मुलांच्या सहवासाखातर त्याने Achieve केल्या.

नुसता बापच नाही,  प्रसंगी आई सुद्धा बनला. आणि जेव्हा त्याचं बिंग फुटलं, तेव्हा त्याच बायकोला सुद्धा पाझर फुटला, आपल्या नवऱ्याचे प्रयत्न बघून. तिने त्याला दुसरी संधी दिली. आणि मुलांना पुन्हा आपले वडील मिळाले.

किती सुंदर गोष्ट !!!! आणि ज्या पद्धतीने Chris Columbus यांनी ती मांडलीये त्याला तोड नाहीये. Home Alone, Harry Potter - And the Sorcerer's Stone, Jingle All The Way  असे चित्रपट देणारे कोलंबस,  किती संवेदनशील आहेत,  त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मिसेस डाउटफायर !!!!


सॅन फ्रान्सिस्को मध्ये शूट झालेली १९९३ ची ही फिल्म एक क्लासिक कॉमेडी आहे. मला आता आठवत नाहीये की मी किती वेळा पाहिली असेल ती, पण कधीच कंटाळा येत नाही. त्यातल्या Moments इतक्या तरल आणि छान आहेत की, आपण गुंगत जातो.

Howard Shore  यांचं अफलातून संगीत आहे. Amazing Background Score !!!! तिथे Hollywood मध्ये background score म्हणजे संपूर्ण फिलहार्मोनिक orchestra वापरून उभं केलं जातं, music ची महती काय वर्णू ? उत्कृष्ट झालंय. 

आत्ता हे लिहिताना मागे youtube वर मिसेस डाउटफायर चा original sound track ऐकतोय. सगळी  फिल्म मनात तरळतेय  -  हेच नाहीये का यश त्या संगीतकाराचं ?



रॉबिन विलियम्स बद्दल बोलायचं म्हणजे सेपरेट ब्लॉग करावा लागेल. निळ्या डोळ्यांचा एक उत्साही, विविध कलर्स परिधान केलेला, अजब प्राणी होता हा माणूस. होता म्हणायला खूप जड जातंय पण २०१४ ला हे जग सोडलं त्यांनी. प्रचंड फॅन आहे मी त्यांचा. सुरुवात इथूनच झाली, मग अनेक सिनेमे पहिले त्यांचे. खळखळवून हसवणारा, आणि क्षणार्धात रडवू शकणारा असा हा कलाकार !!!  




त्यांचा मेक अप विशेष होता या रोल मधला. ती बाई म्हणजे ६५ वर्षाची म्हातारी वाटावी यात मेकअप इतकाच रॉबिन विलियम्स यांचा हात होता..  चालण्याची लकब, स्वतःची शरीरयष्टी थोडी ब्रॉड असल्याने, ती बाई पण तशी वाटावी यासाठी केलेले व्यक्तिमत्वातले बदल अफलातून आहेत.



मिसेस डाउटफायर चा फायनल लुक मिळेपर्यंत झालेली सगळी Transitions एका मस्त गाण्यातून दाखवलीयेत. या पिक्चर मध्ये सगळंच सॉलिड आहे, काय काय सांगायचं?

जेवण न बनवता येणारा एक पुरुष ते टी व्ही वर बघून जेवण बनवू शकणारी आणि उत्तम स्वयंपाक करणारी बाई हा प्रवास, एरवी मुलांना पाठीशी घालणारा बाप ते - केअरटेकर म्हणून मुलांना होमवर्क करायला लावणारी खडूस म्हातारी, असे अनेक प्रसंग पटकथेतून अप्रतिम लिहून मांडलेत.



मला नेहेमीच Hollywood च्या Writers चं विशेष कौतुक वाटतं - कारण त्यांचा Audience खूप वेगळा आहे, जास्त करून तिथे Super-Heroes, Action सिनेमे चालतात, जेव्हा अशा Momentish फिल्म्स बनतात तेव्हा खूप skillfully बनवल्या जातात असं माझं निरीक्षण आहे.



मिसेस डाउटफायर आपल्याला प्रेमात पाडते, एक भीतीयुक्त आदर निर्माण होतो. व्हिलन पण आहे या सिनेमात, त्याला धडा शिकवते तेव्हा आपल्याला मजा येते. बायकोला इतकी वर्ष आपण काय द्यायला हवं होतं - याची जाणीव त्या माणसाला होताना दिसते - पण तो नवरा म्हणून ते बोलून दाखवू शकत नाही. तर केअरटेकर म्हणून तो आपल्याच बायकोला चांगले क्षण पुरवतो. हे सगळं पाहताना आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटतं.

डॅनियल म्हणजेच आपला हिरो - हा एक उत्तम Voice Artist असतोच, पण त्याच्यात एक अभिनेता दडलेला असतो - त्याची पारख होते आणि त्याला एक चांगला शो टीव्ही वर होस्ट करायला मिळतो - याच मिसेस डाउटफायर च्या Character मध्ये, सो Professionally त्याचं बस्तान नीट बसतं - कुठेतरी डॅनियल आयुष्यात मार्गाला लागतो असं  सुंदर Completion दिलय या गोष्टीला.

त्यामुळे एक परिपूर्ण Family Entertainer अशी ही फिल्म. नसेल पाहिली तर आजच पहा. Enjoy करा. प्रत्येक सिनेमा काहीतरी सांगून जातो. बघा - तुम्हाला काय सांगतायत मिसेस डाउटफायर !!!








Monday, 2 July 2018

संजू - A True BioPic!!!!!

राजकुमार हिरानी.




Director Par Excellence !!!!!!
लोकांची नस पकडता येणं काय असतं हे जर शिकायचं असेल तर राजकुमार हिरानी नामक युनिव्हर्सिटी आहे आपल्याकडे. मुन्नाभाई एमबीएबीएस असो, लगे रहो मुन्नाभाई, ३ इडियट्स किंवा पीके !!!

लोकांना Entertain कसं करायचं आणि जाता जाता एक शिकवण कशी देऊन जायचं, हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, मला त्यांची style खूप आवडते Movie Making With A Difference !!!!



सध्या सगळीकडे "संजू" ची चर्चा आहे. परवाच जाऊन पाहिला मी तो. या सिनेमाला जायची ३ कारणं होती.

१ - राजकुमार हिरानी 
२ - रणबीर कपूर  आणि 
३ - संजय दत्त 

मी जनरली, डायरेक्टर कोण आहे?  यावर पहिले ठरवतो सिनेमा पाहायचाय, की नाही ते. दुसऱ्या नंबरवर Actor. कारण अनेक उत्कृष्ट Actors चांगल्या डायरेक्टर अभावी आपटलेत. (आणि चांगल्या स्टोरी - स्क्रिनप्ले अभावी सुद्धा )

सो, राजकुमार हिरानी काय नवीन घेऊन आलेत, याची नेहेमीच उत्सुकता असते. याला एका कलाकाराची "Credibility"  म्हणतात. त्यामुळे त्यांचा सिनेमा पाहायचा होताच.




जेव्हा "रॉकस्टार" पाहिला, तेव्हा रणबीर कपूर ची ऍक्टर म्हणून Depth आणि त्याचं Passion प्रकर्षाने दिसलं.
मला "घुसून" काम करणारे लोक जाम आवडतात. रणबीर असाच  "राजनीती" मध्ये घुसला होता. प्रचंड आवडला तेव्हासुद्धा. आणि संजूचं ट्रेलर बघितलं तेव्हा पुन्हा जाणवलं की एक कलाकार म्हणून वेगळी उंची गाठली असणार, पठ्ठ्याने !!!! त्याचा हा Effort पाहायलाच हवा. :) आणि त्याने बिलकुल निराश केलं नाहीये. खूपच मस्त दिसलाय, वावरलाय, जगलाय, "संजुबाबा" पडद्यावर.

माझं तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण हा सिनेमा पाहण्याचं "संजय दत्त"
मला फ्रँकली तो कधीच आवडला नाही. नेहेमी उदास, राकट, निगेटिव्ह वाटायचा तो मला. त्याचे सिनेमे कधीही पाहिलेले मला आठवत नाहीयेत.




त्यात, त्याच्याबद्दल च्या सतत येणाऱ्या निगेटिव्ह news होत्याच, त्याच्यापासून दूर जाण्यासाठी पुरेश्या.
१९९२ नंतर तो दहशतवादीच समजला गेला; अगदी सिनेमाच्या पडद्यावर सुद्धा आणि मागेही.

आपल्याकडे म्हणजे भारतात मी पाहिलंय, लोक पटकन एखाद्याला जज करतात. आधी खूप कौतुकाने हरभऱ्यावर चढवतात आणि मग पटकन खाली खेचतात. मग तो खेळाडू असो, ऍक्टर असो, नेता असो कुणीही.
त्या माणसाची काहीही माहिती नसते आपल्याकडे. आपण बिलकुल जाणून सुद्धा घेत नाही की खरंच असा असेल का तो ? का असेल ? का झाला असेल?

आणि मत ठोकून तयार....
संजय दत्त बद्दल जवळ जवळ ८०% भारतीयांचं हेच मत होतं - आहे, की तो फुकट गेलेला - चुकीच्या मार्गातला माणूस आहे. पण जेव्हा त्याला पुन्हा जेल झाली आणि तो जेलमध्ये परतला, तेव्हा मला वाटलं की का ?

त्याला तर सहज शक्य होतं, जेल चुकवणं !!!! असे अनेक महाभाग फिरतायत अजून आपल्याकडे.
पण त्याने सजा पूर्ण केली, रडतखडत का होईना, केली. मला तेव्हा जाणवलं की काहीतरी वेगळं आहे. जाणून न घेता आपण मत बनवलय ह्या व्यक्तीबद्दल. आणि संजू सिनेमा announce  झाला तेव्हा मी ठरवलं - कि ज्या प्रश्नांची उत्तरं मी शोधतोय ती इथे मिळतील.

हिरानी सर म्हणजे संजूबाबाचे खास मित्र. त्यामुळे सगळ्यांना वाटणारच की "हा संजुची इमेज सुधारायचाच प्रयत्न असणार" पण खरंच सांगतो. सिनेमा मध्ये राजू सरांनी संजूच्या सगळ्या वाईट गोष्टी बिनदिक्कत पुढे आणल्यायेत, काहीही आडपडदा न ठेवता. यात श्रेय संजूचं  आणि त्यांचं सुद्धा. फक्त संजय दत्त या माणसाला इतकी वर्ष काय म्हणायचं आहे, ते त्यांनी सांगितलंय.

कुठेही संजू चांगला आहे, हे म्हणायचं नसून त्याच्याकडून चूक झाली आणि त्याने त्याची शिक्षा भोगली आहे, त्याला आपण एक भारतीय नागरिक म्हणून सुखाने जगू द्यायला हवं - बस्स इतकंच !!!!!

मला यात कुठेही काहीही वावगं वाटत नाही. कोर्टात गुन्हेगाराला सुद्धा जज विचारतात - तुम्हाला काही म्हणायचं आहे का? Irrespective of  तो दोषी असेल वा नसेल. मग संजय दत्त ची बाजू त्याने सिनेमामधुन मांडली तर काय बिघडलं ?

अजून एक - आपल्याकडे विचित्र डोक्याची पैदास मुबलक आहे, संजुची तुलना नको नको त्या महान लोकांशी करून, त्यांची Biography कशी यापेक्षा महत्वाची हे बोलत बसतात.

सिनेमा हे माध्यम खूप प्रभावी आहे, त्यातून काय घ्यायचं ते अजून आपल्या समाजाला पुरेसं नाही समजलेलं, ती एक कथा म्हणून आपण कधीच का पाहू शकत नाही? सिनेमाच्या अनुकरणापेक्षा शाळेत - कॉलेजात शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींचं अनुकरण झालं तर देश प्रगती करेल.

त्यामुळे, मला संजू आवडला. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि एक सिनेमा म्हणून हे सगळे ग्रेट कलाकार किती Efforts घेतात ते पुन्हा दिसलं!!!!!



रणबीर कपूर ने आधी वजन घटवलं मग बॉडी बनवली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने संजूबाबाचा लहेजा परफेक्ट पकडलाय. ग्रेटनेस हा आहे त्याचा की, रॉकस्टार चं Character हे त्याचं ओरिजिनल होतं, त्यामुळे त्याला ते स्वतंत्रपणे Conceive करता आलं पण संजुबाबा च्या character मध्ये त्याला एका लिमिट मध्ये वावरणं गरजेचं होतं , आणि ते करताना Natural पण वाटलं पाहिजे - This is Extraordinary !!!!!  Salute to रणबीर !!!!
आता माझ्या जनरेशन मध्ये पण कपूर घराण्यातला १ ग्रेट ऍक्टर आहे, असं अभिमानाने म्हणू शकतो मी :)

राजू हिरानी सर, त्यांच्या Character ला जगले, त्यांना जे वाटलं ते त्यांनी बिनदिक्कत मांडलं.
आता त्यांच्यावर कीतीही टीका होवो, मी वाट पाहतोय त्यांच्या Next Project ची......

क्यूकी - "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !!!!!! "