Showing posts with label #MrsDoubtfire #Comedy #RobinWilliams #ChrisColumbus #20thCenturyFox. Show all posts
Showing posts with label #MrsDoubtfire #Comedy #RobinWilliams #ChrisColumbus #20thCenturyFox. Show all posts

Thursday, 5 July 2018

Mrs. Doubtfire !!!!!







मिसेस डाउटफायर -  हसवणारा आणि रडवणारा एक निखळ सिनेमा. I  think ज्या वयात मी हा सिनेमा पहिला तेव्हापासून Hollywood नामक जादुई चित्रनगरीच्या प्रेमात पडायला लागलो.... कसले गोड़ सिनेमे बनवतात हो ?

एका नालायक माणसाची गोष्ट आहे ही. जो आयुष्यात फार काही काम करून, यश नाही मिळवू शकला पण, त्याने आपल्या मुलांवर खूप प्रेम केलं. बायकोशी पटत नव्हतं, त्याला मुक्त आयुष्य जगायचं होतं आणि तिला महत्वाकांक्षा होती. एक दिवशी अचानक काम सोडून घरी आला आणि मुलांसोबत वाढदिवसाची पार्टी करताना त्याने घरात धुमाकूळ घातला. मुलांना मजा आली, पण शेजाऱ्यांना झालेल्या त्रासामुळे बायको वैतागली आणि इतके दिवस सहन केलेला त्रास तिने डिवोर्स देऊन संपवला. 

कोर्टाने मुलांची कस्टडी बायकोला दिली, आणि एका क्षणात या माणसाचं आयुष्य होत्याचं नव्हतं  होऊन बसलं, मग त्याने काय केलं ? आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी ? ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर बोल खाल्ले, त्या सगळ्या गोष्टी, केवळ मुलांच्या सहवासाखातर त्याने Achieve केल्या.

नुसता बापच नाही,  प्रसंगी आई सुद्धा बनला. आणि जेव्हा त्याचं बिंग फुटलं, तेव्हा त्याच बायकोला सुद्धा पाझर फुटला, आपल्या नवऱ्याचे प्रयत्न बघून. तिने त्याला दुसरी संधी दिली. आणि मुलांना पुन्हा आपले वडील मिळाले.

किती सुंदर गोष्ट !!!! आणि ज्या पद्धतीने Chris Columbus यांनी ती मांडलीये त्याला तोड नाहीये. Home Alone, Harry Potter - And the Sorcerer's Stone, Jingle All The Way  असे चित्रपट देणारे कोलंबस,  किती संवेदनशील आहेत,  त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मिसेस डाउटफायर !!!!


सॅन फ्रान्सिस्को मध्ये शूट झालेली १९९३ ची ही फिल्म एक क्लासिक कॉमेडी आहे. मला आता आठवत नाहीये की मी किती वेळा पाहिली असेल ती, पण कधीच कंटाळा येत नाही. त्यातल्या Moments इतक्या तरल आणि छान आहेत की, आपण गुंगत जातो.

Howard Shore  यांचं अफलातून संगीत आहे. Amazing Background Score !!!! तिथे Hollywood मध्ये background score म्हणजे संपूर्ण फिलहार्मोनिक orchestra वापरून उभं केलं जातं, music ची महती काय वर्णू ? उत्कृष्ट झालंय. 

आत्ता हे लिहिताना मागे youtube वर मिसेस डाउटफायर चा original sound track ऐकतोय. सगळी  फिल्म मनात तरळतेय  -  हेच नाहीये का यश त्या संगीतकाराचं ?



रॉबिन विलियम्स बद्दल बोलायचं म्हणजे सेपरेट ब्लॉग करावा लागेल. निळ्या डोळ्यांचा एक उत्साही, विविध कलर्स परिधान केलेला, अजब प्राणी होता हा माणूस. होता म्हणायला खूप जड जातंय पण २०१४ ला हे जग सोडलं त्यांनी. प्रचंड फॅन आहे मी त्यांचा. सुरुवात इथूनच झाली, मग अनेक सिनेमे पहिले त्यांचे. खळखळवून हसवणारा, आणि क्षणार्धात रडवू शकणारा असा हा कलाकार !!!  




त्यांचा मेक अप विशेष होता या रोल मधला. ती बाई म्हणजे ६५ वर्षाची म्हातारी वाटावी यात मेकअप इतकाच रॉबिन विलियम्स यांचा हात होता..  चालण्याची लकब, स्वतःची शरीरयष्टी थोडी ब्रॉड असल्याने, ती बाई पण तशी वाटावी यासाठी केलेले व्यक्तिमत्वातले बदल अफलातून आहेत.



मिसेस डाउटफायर चा फायनल लुक मिळेपर्यंत झालेली सगळी Transitions एका मस्त गाण्यातून दाखवलीयेत. या पिक्चर मध्ये सगळंच सॉलिड आहे, काय काय सांगायचं?

जेवण न बनवता येणारा एक पुरुष ते टी व्ही वर बघून जेवण बनवू शकणारी आणि उत्तम स्वयंपाक करणारी बाई हा प्रवास, एरवी मुलांना पाठीशी घालणारा बाप ते - केअरटेकर म्हणून मुलांना होमवर्क करायला लावणारी खडूस म्हातारी, असे अनेक प्रसंग पटकथेतून अप्रतिम लिहून मांडलेत.



मला नेहेमीच Hollywood च्या Writers चं विशेष कौतुक वाटतं - कारण त्यांचा Audience खूप वेगळा आहे, जास्त करून तिथे Super-Heroes, Action सिनेमे चालतात, जेव्हा अशा Momentish फिल्म्स बनतात तेव्हा खूप skillfully बनवल्या जातात असं माझं निरीक्षण आहे.



मिसेस डाउटफायर आपल्याला प्रेमात पाडते, एक भीतीयुक्त आदर निर्माण होतो. व्हिलन पण आहे या सिनेमात, त्याला धडा शिकवते तेव्हा आपल्याला मजा येते. बायकोला इतकी वर्ष आपण काय द्यायला हवं होतं - याची जाणीव त्या माणसाला होताना दिसते - पण तो नवरा म्हणून ते बोलून दाखवू शकत नाही. तर केअरटेकर म्हणून तो आपल्याच बायकोला चांगले क्षण पुरवतो. हे सगळं पाहताना आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटतं.

डॅनियल म्हणजेच आपला हिरो - हा एक उत्तम Voice Artist असतोच, पण त्याच्यात एक अभिनेता दडलेला असतो - त्याची पारख होते आणि त्याला एक चांगला शो टीव्ही वर होस्ट करायला मिळतो - याच मिसेस डाउटफायर च्या Character मध्ये, सो Professionally त्याचं बस्तान नीट बसतं - कुठेतरी डॅनियल आयुष्यात मार्गाला लागतो असं  सुंदर Completion दिलय या गोष्टीला.

त्यामुळे एक परिपूर्ण Family Entertainer अशी ही फिल्म. नसेल पाहिली तर आजच पहा. Enjoy करा. प्रत्येक सिनेमा काहीतरी सांगून जातो. बघा - तुम्हाला काय सांगतायत मिसेस डाउटफायर !!!