Showing posts with label #Romance. Show all posts
Showing posts with label #Romance. Show all posts

Saturday, 30 June 2018

नवीन ब्लॉग !!!! Dedicated To.... CINEMA !!!!!!!

हाय EVERYBODY !!!!!

बोलके सूर या माझ्या ब्लॉग ला तुमच्याकडून मस्त प्रतिसाद मिळतोय. त्याबद्दल thanks !!!
त्या ब्लॉग मध्ये मी माझ्या Musical Experiences बद्दल बोलतो. आज एक नवा ब्लॉग सुरु करायचं मनात आलं, माझा सर्वात आवडता विषय - वेड म्हणा ना, सिनेमा !!! मुव्हीज !!!!! पिक्चर !!!!



लहानपणीपासूनच मला सिनेमाचं प्रचंड वेड आहे. बाबांनी माझ्या एका वाढदिवसाला स्टर्लिंग सिनेमा ला नेलं होतं, व्ही.टी. ला !! "विलो" नावाचा बुटक्या माणसांच्या साम्राज्याचा सिनेमा होता तो, अजूनही आठवतंय मजा आली होती पाहायला :)

"छोटा चेतन" ची आठवण निघायलाच पाहिजे. माझ्या लहानपणचा पहिला ३डी सिनेमा होता तो. चष्मा घालून पहिला होता. अश्या अनेक सुंदर आठवणी आहेत सिनेमाच्या. त्या सगळ्या इथे नक्कीच सांगेन, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मी पाहिलेले वेगवेगळे सिनेमे, त्याबद्दल बोलूया.

एक उत्कृष्ट माध्यम आहे सिनेमा !!! आणि जगभरात किती टॅलेंटेड लोक आहेत, Creative लोक आहेत जे उत्तमोत्तम सिनेमे बनवतच असतात.

सिनेमाच्या प्रत्येक अंगांबद्दल मला माहिती करून घ्यायला आवडतं. Direction , Story Writing , Dialogues , Editing , Cinematography आणि अशी अनेक Departments  आहेत ज्यांच्या efforts बद्दल आणि greatness बद्दल सुद्धा नक्कीच इथे बोलता येईल.


भलतीच Excitement वाटतेय आज. एक लिस्ट बनवतोय आजच त्या सगळ्या सिनेमांची जे पाहिलेत, आवडलेत, मनात रुजलेत..... मजा येणारे खूप !!!!

सो माझ्या सारखे तुम्ही पण पिक्चर वेडे असाल तर माझा नवीन ब्लॉग जरूर लाईक करा - And Wait फॉर my First movie !!!!





क्यू की - "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !!!!!!!"